Homeसामाजिकजागतिक आदिवासी दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा संपन्न,

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा संपन्न,

पारधी समाजातील युवकांनी पुढे येऊन नवीन पिढी घडवावी लागेल असे आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल,आदिवासी विकास संघ आयोजित आदिवासी दिनानिमित्त मेळाव्यात नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे प्रतिपादन.

दि.९ वृत्त- ९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व आदिवासी युवा विकास संघाच्या वतीने देहुगाव राधाकृष्ण लॉन्स येथे या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जोरदार मार्गदर्शन मेळावा व समाजातील पदवीधरांचा सन्मान सोहळा हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रस्तावना करताना अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे संयोजक माऊली उर्फ किसन भोसले म्हणाले की,हा कार्यक्रम घेण्याचे कारण म्हणजे आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचे मार्गदर्शन समाजाला झाले पाहिजे आणि त्यांचाच आदर्श व मार्गदर्शन,विचार समाजाने आत्मसात करून स्वतःची व समाजाची मुख्य प्रवाहात येण्यासाठी फायदा करून घेतला पाहिजे.हेच या मेळाव्याचे उद्दिष्ट आहे असे यावेळी भोसले म्हणाले, मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे हे होते तसेच विविध सामाजिक शैक्षणिक कामगार चळवळीतील नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाला महिलांचा जोरदार प्रतिसाद पाहण्यास मिळाला व आलेल्या सर्व महिलांना वृक्ष आला आणि महिलांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक व सामाजिक क्षेत्रातील गाढे अभ्यासक धर्मपालजी तंतरपाळे उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले की,आदिवासी पारधी समाजाकडे संधी आणि क्षेत्र असेल तर ते शिक्षणाचे क्षेत्र आहे.” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो पिल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही”,असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तंतरपाळे साहेब म्हणाले. तसेच यावेळी शहरातील कामगार नेते यशवंतराव भोसले यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि पुढे बोलताना म्हणाले,समाजाची इथून पुढची पिढी चांगलं शिक्षण घेऊ लागलेलीआहे आणि तसेच अजून पारधी समाजातील जास्तीत जास्त मुलांनी युवकांनी पुढे येऊन शिक्षण घेऊन डॉक्टर,वकील इंजिनियर,कलेक्टर,तलाठी,ग्रामसेवक असे अधिकारी म्हणून घडले पाहिजे,तरच पारधी समाज मुख्य प्रवाहात येईल.आणि समाजाचा उद्धार होईल. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रसिद्ध शिवव्याख्याते अनिलजी वडघुले,रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्रजी मोरे,प्रवीण भोसले, देहू नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कोंडे साहेब,नगरसेवक कुणाल वाव्हळकर,नगरसेविका अनुराधाताई गोरखे, प्राध्यापक युवराज तिकटे, देऊगावच्या नगराध्यक्ष पूजाताई दिवटे,पथविक्रेता समिती सदस्य प्रल्हाद कांबळे, उत्तमरंगा सकटे,पत्रकार लहू आडसूळ,विशाल भोसले व कार्यक्रमाचे निमंत्रक अंकुश भोसले यांचे यावेळी उपस्थित हजारोंच्या संख्येत उपस्थित समुदायास मार्गदर्शन केले. यावेळी हिराज पवार,दीपक काळे,योगेश पवार,मॅनेजर भोसले,पत्रकार भीमराव बरकडे,सोमनाथ काळे,बी.के भालेराव,दस्तगीर काळे, राजेश ढावरे,अनिल पवार,ओमकार काळे,मीटर पवार,दिनेश काळे,नागेश भोसले, संघटनेच्या अध्यक्ष सौ.शन्नू भोसले,महिला उपाध्यक्ष सौ.शैला शिंदे,महिला संघटक सौ.शारदा काळे जय रविराज भोसले,अनुराग पवार,हर्षल चव्हाण,राकेश चव्हाण, किशोर भोसले,प्रीतम भोसले,शुभम रमेश भोसले, शेखर चव्हाण,ओम चव्हाण, छबू चव्हाण,लांगसाहेब भोसले,भाऊलाल चव्हाण, नोतन भोसले,रमेश भोसले, शरद चायडू भोसले,सोनू चव्हाण,राम चव्हाण,अमोल भोसले,आकाश भोसले,यश चव्हाण,फरीदा चव्हाण, सुगंधा भोसले,निर्मला भोसले,रंजना काळे,उषा चव्हाण,सारिका भोसले, अर्जुन पवार यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!