Homeसामाजिकमहानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

  • पिंपरी, दि. १८ जुलै २०२६ :- “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या जिद्द, प्रतिभा आणि लेखणीच्या बळावर मराठी साहित्यविश्वात अढळ स्थान निर्माण केले तर अवघ्या दीड दिवसांच्या शालेय शिक्षणानंतरही त्यांनी साहित्य, शाहिरी, पोवाडे आणि लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य उभे करत ते साहित्यसम्राट झाले,त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
  •       साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,त्यावेळी त्या बोलत होत्या.
  •        यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, उपायुक्त आण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य भगवान शिंदे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, जेजुरी संस्थानचे विश्वस्त अनिल सौदंडे, समरसता गतिविधिचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक मुकुंदराव आफळे,विलास लांडगे,डॉ.धनंजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे,भाऊसाहेब अडागळे,संजय ससाणे, सतीश भवाळ,अरूण जोगदंड, नितीन घोलप, नाना कसबे, सुनील भिसे, युवराज दाखले, डी. पी. खंडाळे, शिवाजी साळवे, नामदेव रिटे,गीता आढागळे, उषा कांबळे, विशाल कसबे, स्वप्निल वाघमारे, राजू आवळे, गणेश साठे,कैलास पाटोळे, वैशाली जाधव, सविता दुनघव, वंदना सुकळे, शिवाजी खडसे, नंदू कारके, मनोज गायकवाड, सूरज कांबळे, विक्रम गायकवाड, अनिकेत साळवे, अंजना भालेराव, सुनिता मेंगळे, आशा बोराडे, मेघराज साळवे, महादेव आढागळे, राकेश बावणे, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  •    यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी वंचित, शोषित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या वेदना शब्दबद्ध करत त्यांना न्याय आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. ‘फकीरा’सारख्या अजरामर साहित्यकृतीतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आपल्या शाहिरीतून देश-विदेशात पोहोचविण्याचे कार्य केले. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि मानवी मूल्यांचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच मार्गदर्शक असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
  •      याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला उजाळा देत त्यांचेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!