दि. १२ सप्टेंबर २०२६
मावळ, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे एफ. आय. आर. क्र. २३३/२०२३ (सत्र खटला क्र. ५४/२०२३) अंतर्गत स्व. किशोर आवारे खून प्रकरणाची सुनावणी वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात प्रत्यक्षदर्शी आणि इतर साक्षीदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्र व साक्षींमधून अत्यंत गंभीर व खळबळजनक बाबी उघडकीस आल्या आहेत. न्यायप्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी आरोपी व त्यांच्या साथीदारांकडून साक्षीदारांवर राजकीय दबाव, बंदुकीचा धाक, आणि मध्यरात्री घर गाठून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे न्यायालयीन नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची १२ मे २०२३ रोजी दुपारी तळेगाव, नगरपरिषदेसमोर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली होती. आवारे हे स्थानिक राजकारणात सक्रिय होते. त्यांनी त्यांच्या जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले होते. एवढेच नाही तर सोलरवर चालणारे पहिले गाव जे मावळ तालुक्यात तयार झाले आहे त्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. किशोर आवारे यांना पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिना निमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. कोरोना साथरोग, कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीत आवारे यांनी स्वखर्चातून भरीव मदतकार्य केले होते. के. लक्ष्मण जगताप यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून आवारे यांची ओळख होती.
फिर्यादीनुसार किशोर आवारे हत्येप्रकरणी श्याम नगडकर व त्यांचे तीन साथीदार यांच्यासह मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी ८८ दिवसांनी वडगाव मावळ न्यायालयात चार्जशीट सादर केले. त्यातील नऊ आरोपींत शेळके बंधू ची नावे नसण्याचे या गुन्ह्याचे तपास अधिकारी यांनी सांगितले, तसेच मा, उच्च न्यायालयाने रीत याचिका ३८६०/२०२३ मध्ये आमदार शेळके व त्यांचे साथीदार यांना आरोपी का नाही केले असे पोलिसांना विचारून सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून घेतली आहे व त्याची पुढील सुनावणी २४/९/२०२६ ला न्यायप्रविष्ठ आहे,
प्रमुख मागण्या,
किशोर आवारे खून प्रकरणातील साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी त्वरित कठोर कारवाई करावी साक्षीदार मिलिंद अच्युत सुनील कारंडे निलेश पारगे आणि दत्ता पारगे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले असले तरी, आजही फितूर साक्षीदार योगेश पारगे व साक्षीदार सागर दाभाडे यांचा मोठा भाऊ समीर दाभाडे यांच्या मार्फत साक्षीदारावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत किशोर आवारे केसमधील इतर साक्षीदार पोलीस संरक्षण मिळावे ही पोलीस प्रशासनास विनंती,

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ























