HomePimpriसंस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा

पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत पिंपरी-चिंचवडमधील अभियंत्यांनी यंदाचा ‘अभियंता दिन’ उत्साहात साजरा केला. १५ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या संस्मरणीय सोहळ्यास वयाची ६० ते ८८ वर्षे असलेले २०० हून अधिक अभियंते उपस्थित होते. अभियंत्यांमधील बंधुभावाचे दर्शन घडविणारा हा सोहळा ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. ‘स्टार प्रवाह’वरील ‘मी होणार सुपरस्टार महाराष्ट्राचा-२०२२’ स्पर्धेचे फायनलिस्ट अभियंता डी. व्ही. कुलकर्णी यांनी गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचा शुभेच्छा संदेश व्हिडिओद्वारे दाखविण्यात आला.

आरोग्य आणि आनंदी जीवनावर मार्गदर्शन

ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी ‘सिनिअर्सची रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी’, आरोग्य आणि ‘हेल्थ स्पॅन’ यावर मार्गदर्शन केले. Aim, Bonds, Community Living, Diet, Exercise-Rest, Finances/Insurance, Gratitude, Health/Humour आणि Instruments/Immunisation या बाबींचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप, आरोग्यविषयक आर्थिक नियोजन आणि कुटुंबीयांशी संवाद यावर त्यांनी भर दिला.

डॉ. प्रसन्न गद्रे यांनी ‘साठीनंतरचे आयुष्य’ या विषयावर व्याख्यान देताना उत्साही वृत्ती, व्यायाम, जीवनशैली, आहार आणि मानसिक आनंद यांचे महत्त्व सांगितले. ‘HELEN’ या संकल्पनेतून Health, Exercise, Lifestyle, Environment आणि Nutrition याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान

वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ अभियंत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर विश्वेश्वरय्या यांच्या देशाच्या उभारणीतील योगदानाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक अभियंत्याला सर विश्वेश्वरय्या, कोअर ग्रुपचा लोगो, श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान असलेले स्मृतिचिन्ह देण्यात आले.

जुन्या आठवणींना उजाळा

समारंभासाठी औरंगाबाद, धुळे, सोलापूर आणि मुंबई आदी ठिकाणांहूनही अभियंते उपस्थित झाले. ज्येष्ठ अभियंता माधवजी देशिंगकर यांनी आपल्या ‘वालचंदच्या सीमेवर’ आणि ‘मंकी हिल्स’ या पुस्तकांच्या सुमारे ८० प्रती ज्येष्ठ अभियंत्यांना भेट दिल्या. तसेच सामाजिक कार्यासाठी मनोहरजी कोलते आणि योगशास्त्रातील कार्यासाठी सोन्याबापू बोरोटीकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याच्या आयोजनासाठी अविनाश पाटोळे, महेंद्र दिवाकर, अजित महादार, सुरेश गायकवाड, हनुमंतजी मोरे, नंदेश माने, कोंडीभाऊ भोर आणि कोअर ग्रुप लीडर सतीश शिंदे यांच्यासह अभियंता मित्रांच्या टीमने परिश्रम घेतले. महिनाभराच्या नियोजनातून २७६ अभियंत्यांची नोंदणी झाली आणि २०० हून अधिक अभियंते प्रत्यक्ष उपस्थित राहिले.

या संस्मरणीय सोहळ्यानंतर दरवर्षी विभागवार ‘अभियंता दिन’ साजरा करण्याची सूचना अनेक अभियंत्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

किशोर आवारे खून खटलाः न्यायालयात साक्षीदारांचे खळबळजनक खुलासेः राजकीय दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा...

0
  दि. १२ सप्टेंबर २०२६ मावळ, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे एफ. आय. आर. क्र. २३३/२०२३ (सत्र खटला क्र. ५४/२०२३) अंतर्गत स्व. किशोर आवारे खून प्रकरणाची सुनावणी...

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन,

0
  पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा गाठल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले....

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान 

0
संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पिंपरी, पुणे (दि.३० ऑगस्ट २०२६) संघर्ष, साधना म्हणजे आशाताई भोसले, अशा महान व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी...

Translate »
error: Content is protected !!