HomePimpri२१ वा 'आशा भोसले पुरस्कार' श्रेया घोषाल यांना जाहीर - भाऊसाहेब भोईर

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड मध्ये पुरस्कार प्रदान – भाऊसाहेब भोईर

पिंपरी, पुणे (दि.२६ ऑगस्ट २०२६) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

यावर्षीचा हा २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी, (दि. २९ ऑगस्ट) सायं. ५ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे रंगणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे,

पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष योगेश बहल आदींसह कला, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

“आशा भोसले”

या पुरस्काराचे स्वरूप रु. १,११,०००/- (एक लाख ११ हजार रुपये) रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सुरेल आवाजाची छाप उमटविणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल.

हा संपूर्ण सोहळा सर्व संगीतप्रेमी व नागरिकांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे. पिंपरी चिंचवड शहर परिसरातील तमाम रसिकांनी या सांगीतिक व सांस्कृतिक मेजवानीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, यांनी केले आहे.

बुधवारी चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सहकार्य संतोष रासने, गौरी लोंढे, सह कोषाध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य सुदाम परब आदी उपस्थित होते.

नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या या प्रतिष्ठित आशा भोसले पुरस्कारासाठी स्वतंत्र निवड समिती आहे. समितीमध्ये ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, दिलीप काटकर, राजेशकुमार साकला आणि भाऊसाहेब भोईर यांचा समावेश आहे.

या पुरस्काराची सुरुवातीपासूनच गौरवशाली परंपरा राहिली आहे. सन २००२ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेतर्फे हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा सन्मान गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान (शांतनू मुखर्जी) यांसारख्या संगीतातील दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.

यावर्षीच्या मानकरी श्रेया घोषाल यांच्या विषयी :- भारतीय संगीत विश्वात आपल्या सुमधुर आवाजाने स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या श्रेया घोषाल (जन्म: १२ मार्च १९८४) यांनी वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षापासून संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. कोटा येथे पं. महेशचंद्र शर्मा आणि मुंबईत मुक्ता भिडे यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी झी टीव्ही वरील ‘सारेगामापा’ (चिल्ड्रेन स्पेशल) चे विजेतेपद पटकावले. ‘देवदास’ (२००२) चित्रपटातील ‘बैरी पिया’ आणि ‘डोला रे’ या गाण्यांनी त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीची यशस्वी सुरुवात झाली. हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, आसामी, भोजपुरी आणि पंजाबी अशा २० हून अधिक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली आहेत. ‘जादू है नशा है’, ‘बरसो रे’, ‘तेरी ओर’, ‘ये इश्क हाय’, ‘दीवानी मस्तानी’ तसेच मराठीतील ‘जीव दंगला’ व ‘मेरे ढोलना’ ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत.

श्रेया घोषाल यांना ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ‘देवदास’, ‘पहेली’, ‘जब वी मेट’, ‘जोगवा’ इत्यादी), ७ फिल्मफेअर पुरस्कार (आरडी बर्मन न्यू म्युझिक टॅलेंट अवॉर्डसह) आणि १० हून अधिक फिल्मफेअर साऊथ पुरस्कार. याशिवाय अमेरिकेतील ओहायो राज्याने २६ जून हा दिवस “श्रेया घोषाल डे” म्हणून घोषित केला आहे. लंडन येथील युनायटेड किंगडमच्या (लंडन) संसदेत त्यांना भारतीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी विशेष सन्मानाने गौरविले गेले आहे. भारतातील १०० प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तींच्या “फोर्स सेलिब्रेटी १००” यादीत त्यांचा अनेकदा समावेश झाला आहे. झी सिने, स्क्रीन आणि अनेक राज्य शासनांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

किशोर आवारे खून खटलाः न्यायालयात साक्षीदारांचे खळबळजनक खुलासेः राजकीय दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा...

0
  दि. १२ सप्टेंबर २०२६ मावळ, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे एफ. आय. आर. क्र. २३३/२०२३ (सत्र खटला क्र. ५४/२०२३) अंतर्गत स्व. किशोर आवारे खून प्रकरणाची सुनावणी...

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन,

0
  पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा गाठल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले....

Translate »
error: Content is protected !!