HomePimpriज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका

पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार यांनी सर्व अधिकार स्वतःकडे केंद्रीत केले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत,” असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांनी केला.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) नावाखाली लोकशाही प्रक्रियेशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रविवारी (दि. २७) पिंपरीत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आंदोलन केले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना (उबाठा)चे शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी एसआयआर प्रक्रियेविरोधात घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदविले.

चेतन पवार म्हणाले, निवडणूक आयोगाने निर्णय बहुमताने किंवा सर्वसंमतीने घेणे अपेक्षित असताना काही निर्णय परस्पर घेतले गेले. निवडणूक आयोगातील अन्य दोन आयुक्तांच्या विविध निर्णयांवर ज्ञानेश कुमार यांनी आक्षेप नोंदविला होता. तसेच, मतदार यादीचे सॉफ्टवेअर केंद्रीकृत करून राज्यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहे. मतदार यादीशी संबंधित महत्त्वाचे अधिकार एका केंद्रीय व्यवस्थेकडे केंद्रीत करण्यामागे सत्ताधा-यांचा स्वार्थ लपला आहे. ज्ञानेश कुमार हे भाजपचे घरगडी म्हणून काम करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

यापूर्वी एसएसआर (स्पेशल समरी रिव्हिजन) पद्धतीने मतदार याद्यांचे पुनरीक्षण केले जात होते. मात्र, ही प्रक्रिया बाजूला सारून एसआयआर सुरू करण्यात आले. ही प्रक्रिया तातडीने रद्द झाली पाहिजे. ही प्रक्रिया सर्वसामान्य मतदारांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, एसआयआर विरोधातील आंदोलनाची धार आता मुंबईकडे वळणार आहे. आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात अन्य राजकीय पक्षांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सत्ताधा-यांचे हित साध्य करण्यासाठी चुकीची कार्यप्रणाली अवलंबणा-या ज्ञानेश कुमार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांचा त्वरित राजीनामा घेऊन बडतर्फ केले पाहिजे, अशा शब्दांत पवार यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हा प्रमुख रोमी संधु, निवडणूक प्रभारी अशोक वाळके, भोसरी विधानसभा प्रमुख अनिल सोमवंशी, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, संघटक अमोल भालेकर, प्रवक्ते रावसाहेब थोरात, जिल्हा संघटिका अनिता तुतारे यांनी देखील आपली भुमिका मांडली. उपशहर प्रमुख पांडुरंग पाटील, गणेश आहेर, पार्थ गुरव, किरण दळवी, गणेश पाडूळे, दिलीप दंडवते, नितिन बोंडे, सुमित निकाळजे तसेच शिवसैनिक संदीप भालके, अनिल दुराफे, नाथाभाऊ खांडेभरड, शिवाजी शेळके, दीपक भक्त, सचिन कुंडोस्वर, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका कल्पना शेटे, गौरी घंटे, ज्योती भालके, बेबी सय्यद, वैशाली कुलथे, तस्लीम शेख, नाटेकर व इतर शिवसैनिक महिला पदाधिकारी युवा सैनिक सहभागी होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

किशोर आवारे खून खटलाः न्यायालयात साक्षीदारांचे खळबळजनक खुलासेः राजकीय दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा...

0
  दि. १२ सप्टेंबर २०२६ मावळ, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे एफ. आय. आर. क्र. २३३/२०२३ (सत्र खटला क्र. ५४/२०२३) अंतर्गत स्व. किशोर आवारे खून प्रकरणाची सुनावणी...

Translate »
error: Content is protected !!