दि,18/6/2026 देहू रोड
प्रतिनिधी, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ, अण्णाभाऊ साठे यांचे नातू मा, सचिन साठे व सकल मातंग समाजाच्या वतीने पुणे ते मुंबई आझाद मैदान येथे अ ब क ड उपवर्गीकरण मागणी पदयात्रेचे देहूरोड शहरांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले,
राम यादव अडसूळ ज्येष्ठ समाजसेवक यांच्या वतीने पदयात्रेतील कार्यकर्त्यांना चहा व नाश्त्याचे आयोजन करण्यात आले, माजी नगरसेविका सौ सुमनताई नेटके व राजू नेटके सरपंच किवळे गाव यांच्या वतीने सचिन भाऊ साठे यांचा सत्कार करण्यात आला, सोबत राजाराम दादा असोरे ,युवराज दाखले शिवशाही शासन पक्ष अध्यक्ष, आनंद कांबळे, अविनाश गायकवाड, कैलास थोरवे, अमर अडसूळ, व असंख्य लहू सैनिक उपस्थित होते

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















