- देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या गैरसोयी संदर्भात तसेच नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
- तसेच शीतळानगर, देहूरोड येथील स्मशानभूमी शेडचे पत्रे खराब झाले आहे ,ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्यात आले.
- यावेळी उपस्थित असलेले देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक मा. हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू, देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू, उपाध्यक्ष वेंकटेश कोळी, सचिव गोपाळ वेंकोबा राव, सहसचिव बबन टोम्पे, वेंकटेश विश्वनाथ, विष्णू नरसाप्पा, वेंकटेश मारीमुत्तू तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















