जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारीच्या पार्श्वभूमीवर, प्रांत अधिकारी यशवंत माने यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. देहू येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात ही आढावा बैठक पार पडली.बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे१. मूलभूत सोयीसुविधा पुरवणे वारीदरम्यान वारकऱ्यांना औषधे आणि पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे.अखंडित वीजपुरवठा, गॅस सिलेंडर आणि निवास व्यवस्था सुरळीत ठेवणे.शौचालय आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करणे.२. वाहतूक आणि सुरक्षितता PMPML बस चालकांनी वाहने अत्यंत सुरक्षितपणे चालवणे.मद्यप्राशन करून वाहन चालवणे पूर्णपणे टाळावे, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत.३. वीजपुरवठा नियोजनमहावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना केवळ यात्रेपुरताच नव्हे, तर वर्षभर अखंड वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत विशेष निर्देश दिले गेले.उपस्थित मान्यवर , अधिकारी आढावा बैठकीस विविध विभागांचे प्रमुख आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते:प्रशासकीय व पोलीस अधिकारी: प्रांत अधिकारी यशवंत माने, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, तहसीलदार जयराज देशमुख, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) सत्यजित आदमाने, API आदिनाथ महानवर आणि बी. एस. शिंदे.विविध विभाग प्रतिनिधी: रामदास विरणक, राजेश जाधव (PMPML), ईश्वर चौधरी व ऋषिकेश बनसोडे (विद्युत पुरवठा), विवेक अवघडे (देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड), अ. डी. कडवे (तळेगाव एस.डी. डेपो), डी. आर. नरवडे, चैत्राली गायकवाड, डॉ. संघमित्रा सहारे, डॉ. किशोर यादव आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॲड. कैलास पानसरे.स्थानिक प्रतिनिधी: देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे आणि देहूचे माजी सरपंच कांतीलाल काळोखे.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ




















