सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भाऊ साबळे यांचे नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
लोणावळा, दि. १७ ऑगस्ट २०२६ : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भावनांच्या पार्श्वभूमीवर उद्या, मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी काढण्यात येणाऱ्या आरक्षण यात्रा व जनआक्रोश महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन च लोणावळा शहर येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा साबळे यांनी केले आहे.
या अनुषंगाने त्यांनी हँडवेल वाटप करून समाजातील नागरिकांच्या भेटी घेऊन मोर्चाची माहिती दिली. तसेच समाजबांधवांनी संघटितपणे महामोर्चात सहभागी होऊन आरक्षणाच्या मागणीसाठी आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन केले.
“आरक्षण वाचवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे. उद्याच्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा,” असे आवाहन कृष्णा साबळे यांनी केले.
मोर्चाची माहिती
– दिनांक : मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
– कार्यक्रम : आरक्षण यात्रा व जनआक्रोश महामोर्चा
– आवाहन : सर्व समाजबांधव व नागरिकांनी सहभागी व्हावे

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ




















