पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लोकनियुक्त पथविक्रेता समितीचे सदस्य माऊली उर्फ किसन भोसले यांनी शहरातील पथविक्रेत्यांची भेट घेऊन त्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज भाजी मंडईला भेट देत त्यांनी भाजी विक्रेते तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सर्व पथविक्रेत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या व्यवसायासंदर्भातील समस्या, अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेतले.
पथविक्रेत्यांनी मांडलेल्या समस्या समजून घेत, येत्या काळात त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही माऊली उर्फ किसन भोसले यांनी दिली. “पथविक्रेत्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आपण निश्चितपणे काम करू. त्यांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे त्यांनी सांगितले.
या भेटीमुळे पथविक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या समस्या समितीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने मांडल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ




















