HomePimpriबाबासाहेबांचा विचार जनतेपर्यंत नेणाऱ्या अण्णा भाऊंचा अपमान म्हणजे बाबासाहेबांचाच अपमान!

बाबासाहेबांचा विचार जनतेपर्यंत नेणाऱ्या अण्णा भाऊंचा अपमान म्हणजे बाबासाहेबांचाच अपमान!

धम्म म्हणजे करुणा, प्रज्ञा, समता – द्वेष नाही! 

पिंपरी-चिंचवड, दि. ०५ जून २०२६: काही लोक स्वतःला बौद्ध म्हणवून घेत लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांनी वैचारिक भूमिका स्पष्ट करत सडेतोड उत्तर दिले आहे.

1. ‘बुद्धाची शपथ’ – अण्णा भाऊंचं बुद्धधम्मावरचं समर्पण: 

अण्णा भाऊंनी द्वेष करणाऱ्यांनाही ‘बुद्धाची शपथ’ सारखी अमूल्य कथा दिली. या कथेतून त्यांनी भगवान बुद्धांच्या “हिंसेकडून अहिंसेकडे” आणि “अज्ञानाकडून ज्ञानाकडे” नेणाऱ्या विचारांचा गौरव केला. कथेतील भिकाजी बुद्धांची शपथ घेऊन मानवी कल्याणाचा मार्ग स्वीकारतो.

जो लेखक बुद्धाचे विचार इतक्या ताकदीने मांडू शकतो, त्याला कमी लेखणारे खरे बौद्ध कसे असू शकतात? कारण बुद्धांचा धम्म मान जोडायला शिकवतो, तोडायला नाही. धम्माचा गौरव करणाऱ्याचा अपमान करणे म्हणजे धम्माच अपमान आहे.

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान – अण्णा भाऊंचं समर्पण:  

अण्णा भाऊ साठे हे बाबासाहेबांच्या विचारांचे झुंजार सैनिक होते याचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे त्यांची कादंबरी ‘फकिरा’. अण्णा भाऊंनी ‘फकिरा’ ही कादंबरी “जग बदलू घालत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस सप्रेम भेट” म्हणून अर्पण केली आहे.

जो माणूस बाबासाहेबांना आपला आदर्श मानतो, त्या अण्णा भाऊंचा अपमान करणे म्हणजे बाबासाहेबांच्या वैचारिक वारशाच अपमान करण्यासारखे आहे.

3. बुद्धांची ‘मानवता’ विरुद्ध द्वेषाची ‘मानसिकता’:  

भगवान बुद्धांनी सांगितले आहे:  

“न हि वेरेन वेराणि सम्मन्तीध कुदाचनं”  

द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, तो प्रेमाने आणि करुणेनेच संपतो.

जर कोणी बौद्ध असूनही अण्णा भाऊंबद्दल द्वेष पसरवत असेल, तर ते बुद्धांच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात वागत आहेत. बुद्धाचा धम्म करुणा, प्रज्ञा, समता आणि मानवता शिकवतो. तिथे द्वेषाला जागा नाही.

अण्णा भाऊंनी आपल्या शाहिरीतून कोणत्याही एका जातीचे कल्याण मागितले नाही, तर संपूर्ण शोषित, कामगार आणि मानवी समाजाच्या मुक्तीची भाषा केली.

4. “जग बदलू घावूनी घाव, सांगून गेले मला भीमराव”:  

बाबासाहेबांनी दिलेला क्रांतीचा संदेश अण्णा भाऊंनी आपल्या डफावर थाप मारून झोपलेल्या समाजाला जागं करण्यासाठी वापरला. बाबासाहेबांचा विचार गावोगावी, वस्ती-वस्तीपर्यंत रुजवणारा हा लोकशाहीर कमी लेखण्यापलीकडचा आहे.

शिवशाही शासन पक्ष व शिवशाही व्यापारी संघाची भूमिका:  

अण्णा भाऊंची लेखणी बुद्ध आणि भीमराव दोघांसाठी वाहिली गेली आहे. त्यांना कमी लेखणे म्हणजे आपल्या मूळावरच घाव घालणे आहे. आम्ही सर्व बौद्ध बांधवांना आवाहन करतो की वाद सोडा, बुद्धाची करुणा आणि बाबासाहेबांची समता आत्मसात करा.

युवराज भगवान दाखले  

अध्यक्ष, शिवशाही व्यापारी संघ  

संस्थापक प्रमुख, “शिवशाही शासन पक्ष”  

संपर्क: 9922373959

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!