HomePimpriपिंपरी चिंचवड महापालिकेची २५० कोटींच्या मालमत्ता कराची वसुली

पिंपरी चिंचवड महापालिकेची २५० कोटींच्या मालमत्ता कराची वसुली

ऑनलाइन माध्यमातून २३० कोटींहून अधिक कर जमा; दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांचा प्रतिसाद

पिंपरी, २९ मे २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मालमत्ता कर वसुलीत लक्षणीय प्रगती नोंदविली आहे. १ एप्रिल ते २९ मे २०२६ या कालावधीत महापालिकेकडे २५० कोटी ७२ लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत शहरातील २ लाख ४७ हजार ३७१ मिळकतधारकांनी मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये डिजिटल माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे दिसून आले असून, २ लाख २१ हजार ७६३ नागरिकांनी ऑनलाइन कर भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून २३० कोटी ५७ लाख रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे.

शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षाची कर देयके संबंधित मालमत्ताधारकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका उप आयुक्त सचिन पवार यांनी यावेळी सांगितले.

महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग नागरिक तसेच पर्यावरणपूरक निवासी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाइन कर भरणाऱ्या नागरिकांना १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने ऑनलाईन कर भरण्यास नागरिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

मालमत्ता कराच्या वेळेवर होणाऱ्या भरण्यामुळे शहरातील विकासकामांना आर्थिक बळ मिळते. ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद समाधानकारक असून, अद्याप कर न भरलेल्या नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा. 

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर संकलनाला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा नागरिकांच्या करदायित्वाबाबतच्या सजगतेचे प्रतीक आहे. महापालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल सुविधांमुळे नागरिकांना घरबसल्या, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने कर भरणे शक्य झाले आहे. ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी सवलतीचा लाभ उपलब्ध असून, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचा महिना शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी विलंब न करता डिजिटल सुविधेचा वापर करून वेळेत मालमत्ता कर भरावा.

 सचिन पवार, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

0
  अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या...

वाकड पोलिसांकडून वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश

0
  ३ आरोपी जेरबंद, २५ दुचाकी जप्त वाकड : वाकड पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ चोरीच्या दुचाकी...

देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माझी नगरसेवक मा, हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांची पुणे जिल्हा काँग्रेस...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मा. हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तु यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल...

Translate »
error: Content is protected !!