HomePimpriबसची वाट पाहणाऱ्या तरुणीची छेडछाड करणारा विकृत अटक

बसची वाट पाहणाऱ्या तरुणीची छेडछाड करणारा विकृत अटक

पिंपरी : पुणे जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवडमधून महिलांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर एका 24 वर्षीय तरुणीची अश्लील हावभाव करत छेडछाड करण्यात आली. मात्र, पीडित तरुणीने दाखवलेले धाडस आणि पिंपरी पोलिसांचा तांत्रिक तपास यामुळे या विकृत आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जाकीर हमीद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास पीडित 24 वर्षीय तरुणी कंपनीच्या बसची वाट पाहत एम्पायर इस्टेट बीआरटी स्टँडवर उभी होती. सकाळी वर्दळीची वेळ असतानाही आरोपी जाकीर शेख तिथे आला आणि त्याने तरुणीला पाहून अश्लील चाळे व हावभाव करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने न घाबरता तरुणीने अत्यंत हुशारी आणि धाडस दाखवले. 

तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पुरावा गोळा करण्यासाठी तात्काळ मोबाईल काढून आरोपीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. तरुणी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत असल्याचे पाहताच आरोपी जाकीर घाबरला. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने अंगातील जॅकेट आणि डोक्यातील टोपी तिथेच रस्त्यावर फेकून दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा करून त्याची कसून तपासणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. अखेर पिंपरी पोलिसांच्या पथकाने वाल्हेकरवाडी परिसरात सापळा रचून आरोपी जाकीर हमीद शेख याला ताब्यात घेतले. 

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

0
  अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या...

वाकड पोलिसांकडून वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश

0
  ३ आरोपी जेरबंद, २५ दुचाकी जप्त वाकड : वाकड पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ चोरीच्या दुचाकी...

देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माझी नगरसेवक मा, हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांची पुणे जिल्हा काँग्रेस...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मा. हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तु यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल...

Translate »
error: Content is protected !!