पिंपरी-चिंचवड, दि. ०५: काळेवाडी परिसरात अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक व संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या अमानवीय कृत्याचा शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेनेने तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.
शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त मा. विनयकुमार चौबे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
“नसरापूरनंतर आता काळेवाडीत अडीच वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार. हे सत्र थांबणार कधी? समाजमन सुन्न करणाऱ्या अशा घटना वारंवार घडत आहेत. चिमुकल्या मुलीही सुरक्षित नाहीत, हे विदारक वास्तव आहे,” असे युवराज दाखले म्हणाले.
युवराज दाखले यांच्या प्रमुख मागण्या:
1. आरोपीला तातडीने अटक करून POCSO कायद्यांतर्गत कडक कलमे लावावीत.
2. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून 60 दिवसांत निकाल लावावा.
3. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी.
4. पीडित चिमुरडी व कुटुंबाला शासनाने तातडीने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत व मोफत वैद्यकीय उपचार द्यावेत.
5. पिंपरी-चिंचवड शहरात लहान मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वसाहतीत CCTV व गस्त वाढवावी.
“मी तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. अन्याय सहन करणार नाही. पोलीस प्रशासनाने अटक आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. अन्यथा शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा युवराज दाखले यांनी दिला आहे.
“पोटच्या गोळ्याला आता पाळणाघरातही सुरक्षित ठेवता येत नाही, ही शोकांतिका आहे. सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने आता तरी जागे व्हावे,” असेही ते म्हणाले.
युवराज भगवान दाखले
संस्थापक अध्यक्ष, शिवशाही व्यापारी संघ
मुख्य प्रवक्ते, हिंदू मातंग सेना
संपर्क: 9922373959
—

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















