देहूरोड : आज दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी ऐतिहासिक सुभाष चौक येथे देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा देहूरोड शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मा. श्री. हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू तसेच उपाध्यक्ष श्री. वेंकटेश कोळी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे उपाध्यक्ष अबूबखर लांडगे, मावळ तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख, शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार रमेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष मिकी कोचर, मावळ तालुका नेते संजय पिंजन, देहूरोड काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकर टी. जयसिंग, सचिव गोपाळ वेंकोबा राव, सहसचिव बबन टोम्पे, ज्येष्ठ नेते अशोक कुसळे, युवा नेते मलिक शेख,अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष विल्सन पालिवाल, सक्रिय कार्यकर्ते विष्णू नारासाप्पा, संतोष पांडियान, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष आकाश रामनारायण, कामगार नेते राकेश सोळंकी, युवा नेते वेंकटेश मारीमुत्तू, युवा नेते आसिफ सय्यद, युवा नेते मारीमुत्तू अम्मावसी, महिला ज्येष्ठ नेत्या तावमनी अम्मावसी, ज्येष्ठ नेते माणिक वाघमारे, किसन सुरवसे, युवा नेते प्रवीण भोसले तसेच देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















