Homeताज्या बातम्याहुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी : -उपमहापौर शर्मिला बाबर

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी : -उपमहापौर शर्मिला बाबर

क्रांतिदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारकांना अभिवादन…

पिंपरी दि.९ ऑगस्ट २०२६:- “देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अमूल्य पर्व आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांमुळेच आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणे आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हा वारसा भावी पिढ्यांनी जपणे आवश्यक आहे, हुतात्म्यांच्या बलिदानातून देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, धैर्य आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घेऊन तरूणांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

“इन्कलाब जिंदाबाद”,”भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी भारतमातेचा जयजयकार करत ९ ऑगस्ट क्रांती दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी संपन्न झाला यावेळी उपमहापौर बाबर या बोलत होत्या.

महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त चिंचवड येथील हुतात्मा चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास, चिंचवड स्टेशन येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे पुष्पहार अर्पण करून आज उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शहरातील विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांस विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, ब प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, नगरसदस्या राजू बनसोडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माई काटे,प्रतिक्षा जवळकर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन घोलप,प्रसाद केसरे, स्वप्निल वाघमारे, युवराज दाखले, मयूर घोलप,विशाल वाळुंजकर, गणेश वाळुंजकर,सुभाष सिंगल,धर्मेंद्र क्षीरसागर,आबा कोळेकर,संजय बाईत,अनिता वाळुंजकर आदी उपस्थित होते,

चिंचवड गावातील थोर क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांनी बाळकृष्ण आणि वासुदेव या बंधूसह पुण्यामध्ये औंध येथील गणेशखिंडीत रॅन्ड या जुलमी इंग्रज अधिकार्‍याची हत्या केली आणि देशाच्या क्रांतीच्या इतिहासातील क्रांतीची मशाल अधिकच प्रज्वलीत केली. त्यांच्या या कृत्याबद्दल इंग्रजांनी चापेकर बंधूना आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा दिली गेली, त्यांच्या स्मरणार्थ चिंचवड येथे हुतात्मा चापेकर चौकात चापेकर बंधू तसेच त्यांचे सहकारी रानडे यांचे भव्य समूह स्मारक बांधण्यात आले आहे.

चिंचवड स्टेशन येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळाआहे. वस्ताद लहुजी साळवे हे आद्य क्रांतीगुरू दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, निशानेबाजी यासारख्या युद्धकलेत निपुण होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांच्या फौजा तयार केल्या होत्या.

दापोडी येथे शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांचा पुतळा आहे. इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले.त्यांच्या बलीदानामुळे देशातील स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा मिळाली तर हुतात्मा नारायण दाभाडे हे देखील लहान वयात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झाले.

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात पिंपरी-चिंचवड शहराचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान आहे असे सांगून शहरातील तसेच देशातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक ,शहीद तसेच वीर जवानांच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा संपन्न,

0
  पारधी समाजातील युवकांनी पुढे येऊन नवीन पिढी घडवावी लागेल असे आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल,आदिवासी विकास संघ आयोजित आदिवासी दिनानिमित्त मेळाव्यात नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे...

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी (परतीचा प्रवास) सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने...

0
  पिंपरी, दि. ८ ऑगस्ट २०२६ :- आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथून विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे आज...

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

0
  अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या...

Translate »
error: Content is protected !!