Homeताज्या बातम्यामहापालिकेची पूर्वपरवानगी घेऊनच खाजगी जागी जाहिरात फलक उभा करू शकतात,

महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊनच खाजगी जागी जाहिरात फलक उभा करू शकतात,

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जाहिरात फलक संदर्भात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियामातील नियम २४४,२४५ तसेच महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण ९ मे २०२२ चे अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊनच खाजगी जागेत जाहिरात फलक उभा करणेची तरतुद आहे.
  • पिंपरी चिंचवड हे शहर देशपातळीवरती औद्योगिक शहर म्हणुन ओळखले जाते. सध्या पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
  • त्यानुसार शहराचे सौदर्य अबाधित राखणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेची पुर्व परवानगी न घेता जाहिरात फलक उभे केले जातात, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात देखील घट होत आहे. यास्तव शहराच्या सौंदर्यात आणि महसुलात वाढ व्हावी याकरिता अनधिकृत जाहिरात फलकावर प्रतिबंध व नियंत्रण म्हणून आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत अनधिकृत जाहिरात फलकांची पहाणी करून ते तातडीने निष्कासित करण्याची मोहिम व कारवाई सद्यस्थितीत शहरात सुरू आहे.
  • पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिवन नगर, मेरी गोल्ड हॉस्पीटल जवळ, ताथवडे, पुणे ३३ येथे मे. अद्विक अँडव्हरटायझिंग यांनी अनधिकृतपणे ४०× ३० फूट आकाराचा जाहिरात फलक उभा केलेचे निदर्शनास आल्याने, आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत विनोद सरकानिया, परवाना निरीक्षक यांनी उप आयुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रस्तुत जाहिरात फलक आज दि.२१.०७.२०२६ रोजी कारवाई करून (लोखंडी स्टक्चरसह) निष्कासित करण्यात आला आहे.
  • तरी, याद्वारे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सर्व जाहिरात एजन्सींना सुचित करणेत येते की, या पुढे शहरामध्ये अनधिकृत जाहिरात फलक उभे करणेत येऊ नये, असे अनधिकृत जाहिरात फलक उभे केल्याचे निदर्शनास आलेस ते पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे तात्काळ निष्कासित करणेत येतील. याची गंभिरपणे नोंद घ्यावी.
  • (राजेश आगळे)
  • उपआयुक्त, (परवाना)
  • आकाशचिन्ह व परवाना विभाग,
  • पिंपरी चिंचवड म.न.पा.,
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!