HomePimpriशिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेनेच्या वतीने महाराष्ट्र स्थापना दिवस व...

शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेनेच्या वतीने महाराष्ट्र स्थापना दिवस व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी, दि. १ मे २०२६: शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेना व पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज यांच्या संयुक्त विद्यमाने ६६ वा महाराष्ट्र स्थापना दिवस व जागतिक कामगार दिन पिंपरी येथे मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.

संदिपान झोंबाडे व गुलाबराव गरूड यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना व कामगार चळवळीतील सर्व श्रमिक, कष्टकरी बांधवांना अभिवादन करण्यात आले.

युवराज दाखले म्हणाले, “महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मातंग समाजासह सर्व वंचित, शोषित कामगार बांधवांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक हक्कासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अ ब क ड वर्गीकरणाच्या ऐतिहासिक निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून खऱ्या गरजू कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील.”

याप्रसंगी रिक्षाचालक, हमाल, बांधकाम मजूर, सफाई कामगार, घरेलू कामगार व छोटे व्यापारी बांधवांना लाडू वाटप करण्यात आला. “जय महाराष्ट्र, जय कामगार, कामगार एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान या कार्यक्रमात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने फाऊंडेशन दिल्ली याठिकाणी व्हावे अशी मागणी प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी केली आहे,

यावेळी भारतीय लहुजी पँथरचे संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबडे, हिंदू मातंग सेना संस्थापक अध्यक्ष अरूण जोगदंड, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा हिंदू मातंग सेना मुख्य प्रवक्ते तथा कार्यकारी प्रमुख युवराज दाखले, मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ धनंजय भिसे, बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल, तसेच

स्वप्नपूर्ती ग्रुपचे तथा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व मा अध्यक्ष मार्गदर्शक डी पी खंडाळे, रामदास कांबळे, आण्णासाहेब कसबे, शिवशाही माथाडी कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष सचिन दोनगहू, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष, मंगेश डाखोरे, दिलित स्वयम संघ संघाचे मा प्रमुख सोपान चव्हाण, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व सचिव विशाल कसबे,प्रशांत बरल, शिवशक्ती भीमशक्ती लहुजी शक्तीचे प्रणेते गुलाबराव गरूड,बालाजी गवारे, काशिनाथ हतागळे, मधुकर गवारे, आप्पासाहेब खवले, विलास रूपटक्के, संदिपान अल्लाट, माथाडी कामगार नेते आंबा मांढरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

तसेच कार्यक्रमास हिंदू मातंग सेना व शिवशाही व्यापारी संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!