HomePimpriलोकनेते स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे तैलचित्र महानगरपालिकेत लावा

लोकनेते स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे तैलचित्र महानगरपालिकेत लावा

स्वराज्य पक्षाचे संजय ठाकरे यांची मागणी

पिंपरी : कै. आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप हे पिंपरी -चिंचवड शहरातील अत्यंत प्रभावी, लोकाभिमुख व कार्यसम्राट नेते होते तसेच त्यांचे शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांचे तैलचित्र महानगरपालिकेत लावण्यात यावे अशी मागणी स्वराज्य पक्षाचे संजय ठाकरे यांनी केली आहे.

निवेदनात म्हणले आहे कि, शेतकरी कुटुंबात १५ फेब्रुवारी १९६३ रोजी जन्मलेले जगताप साहेब यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य आणि आमदार या पदांपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

पिंपळे गुरव येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी १९८६ मध्ये प्रथम नगरसेवक म्हणून निवडून येत पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेत सलग २० वर्षे जनतेचे प्रतिनिधित्व केले. १९९३-९४ मध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत महापौर म्हणून त्यांनी शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या विविध पक्षांत काम करताना नेहमी जनतेच्या विकासाला प्राधान्य दिले. २००४ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधान परिषद निवडणूक जिंकून आपली ताकद सिद्ध केली. २००९, २०१४ व २०१९ मध्ये आमदार म्हणून विजय मिळवत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला.

लक्ष्मणभाऊ यांनी पिंपरी–चिंचवड शहरासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले, त्यामध्ये प्रामुख्याने :

रस्ते रुंदीकरण, सिमेंट रस्ते व उड्डाणपूल उभारणी , पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्थेची सुधारणा, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी, झोपडपट्टी पुनर्वसन व नागरी विकास, औद्योगिक विकास व रोजगार निर्मिती, अटल आरोग्य शिबिर” माध्यमातून लाखो रुग्णांना सेवा, कोविड-१९ काळात स्वतः आजारी असतानाही गरजूंना अन्न पुरवणे, कोल्हापूर पूरग्रस्तांना आर्थिक मदत व साहित्य पुरवठा, सर्व पक्षांशी स्नेहपूर्ण संबंध राखणे, पिंपरी–चिंचवड जनतेशी घट्ट नाळ जोडणे, शास्तीकर माफीसाठी प्रयत्न, १२.५% परताव्यासाठी आवाज उठवणे, मेट्रो प्रकल्पासाठी प्रयत्न, भोपखेल येथील संरक्षण खात्याच्या जमिनीवरील रस्ते व पूल प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार, सरकारी रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी ओपीडी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले.

तसेच लक्ष्मणभाऊंनी राज्यसभा निवडणुकीवेळी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या पश्चात झालेली पिंपरी–चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही भावनिक स्वरूपाची होती. सर्व पक्षांनी एकत्र येऊन ती बिनविरोध करावी, ही जनतेची अपेक्षा होती. तरीही संघर्षातून जगताप कुटुंब पुढे आले आणि जनतेच्या पाठिंब्याने आश्विनी जगताप यांना आमदार बनवण्यात यश आले.

तद्नंतर आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची उणीव आमदार शंकरभाऊ जगताप यांनी भरून काढली परंतु मनामध्ये रुखरुख तशीच राहिली कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची महानगरपालिकेतील गैरहाजेरी कुठतरी कमी भरून काढण्याचा हा निस्वार्थ प्रयत्न आहे.

आज त्यांच्या या उत्तुंग कार्याची दखल घेणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेत दालनात, महापौर दालनात तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या दालनात कै. लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे तैलचित्र लावण्यात यावे. तसेच शहरात योग्य ठिकाणी आण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याप्रमाणे त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा. ही सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांची मनापासूनची भावना व मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा संपन्न,

0
  पारधी समाजातील युवकांनी पुढे येऊन नवीन पिढी घडवावी लागेल असे आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल,आदिवासी विकास संघ आयोजित आदिवासी दिनानिमित्त मेळाव्यात नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे...

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी : -उपमहापौर शर्मिला बाबर

0
  क्रांतिदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारकांना अभिवादन... पिंपरी दि.९ ऑगस्ट २०२६:- “देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अमूल्य पर्व आहे. देशासाठी...

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी (परतीचा प्रवास) सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने...

0
  पिंपरी, दि. ८ ऑगस्ट २०२६ :- आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथून विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे आज...

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

0
  अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

Translate »
error: Content is protected !!