HomePimpriसांगवी दापोडीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजना

सांगवी दापोडीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजना

पिंपरी, दि. १७ जुलै २०२६ : सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणींची पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने दखल घेतली असून, पाणीपुरवठा अधिक नियमित, वेळापत्रकानुसार आणि सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक निर्देश देण्यात आले असून, पाणीपुरवठा व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगवी व दापोडी परिसरातील जलवाहिन्या, उंच जलकुंभ आणि वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. पाण्याच्या टाक्यांवर नियमित कर्मचारी उपलब्ध राहतील, वितरणाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल तसेच नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांत काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वितरण व्यवस्थेचे तांत्रिक परीक्षण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आवश्यक असेल तेथे मनुष्यबळ वाढविणे, देखरेख मजबूत करणे आणि पाणीपुरवठा नियंत्रण प्रणाली अधिक सक्षम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

याशिवाय पाण्याच्या गुणवत्तेवरही विशेष भर देण्यात आला असून, नियमित नमुना तपासणी, जलकुंभांची स्वच्छता आणि वितरण यंत्रणेवर सतत देखरेख ठेवली जात आहे. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे यांनी सांगितले की, “सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून नियमित आणि वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल.”

महापालिकेने नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालय अथवा पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठा अधिक नियमित, पारदर्शक आणि वेळापत्रकानुसार करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून जलकुंभ, जलवाहिन्या आणि पाणीपुरवठा प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. 

 अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

किशोर आवारे खून खटलाः न्यायालयात साक्षीदारांचे खळबळजनक खुलासेः राजकीय दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा...

0
  दि. १२ सप्टेंबर २०२६ मावळ, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे एफ. आय. आर. क्र. २३३/२०२३ (सत्र खटला क्र. ५४/२०२३) अंतर्गत स्व. किशोर आवारे खून प्रकरणाची सुनावणी...

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन,

0
  पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा गाठल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले....

Translate »
error: Content is protected !!