Homeताज्या बातम्याआमदार सुनील शेळके यांना मंत्री पदाची शक्यता; 

आमदार सुनील शेळके यांना मंत्री पदाची शक्यता; 

वडगाव मावळ दि.22 (प्रतिनिधी) मावळच्या राजकारणात मोठ्या राजकीय चर्चेला उधाण; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना मंत्री मंडळात मंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसे झाल्यास मावळ तालुक्याला पुन्हा एकदा ‘लाल दिवा’ मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील आगामी राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षांतर्गत बदलांच्या पार्श्वभूमीवर शेळके यांच्या नावाला विशेष महत्त्व मिळत असल्याचे बोलले जात आहे.

सध्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे आहे. मात्र पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी नेतृत्वाला संधी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्त्वाच्या बदलांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील शेळके यांचे नाव आघाडीवर आल्याची चर्चा आहे.

मावळ तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर एकेकाळी हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, भाजपने रूपलेखा ढोरे यांना उमेदवारी दिल्यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली. त्यानंतर भाजपने मजबूत संघटन उभारले आणि बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद आणखी वाढली. भेगडे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर मावळला राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख मिळाली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमध्ये आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. अखेर अजित पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली आणि त्या निर्णयाने मावळच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. पहिल्याच निवडणुकीत शेळके यांनी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर दुसऱ्यांदा देखील त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले. लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाची मजबूत सत्ता उभी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे त्यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा आहे.

मावळच्या राजकीय इतिहासात यापूर्वी मदन बाफना आणि बाळा भेगडे या दोन नेत्यांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. आता सुनील शेळके यांच्या नावाची विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाल्याने मावळमध्ये पुन्हा राजकीय उत्सुकता वाढली आहे. उपाध्यक्षपद हे मंत्रिपदाइतकेच प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने, शेळके यांच्याकडे ही जबाबदारी आल्यास मावळच्या राजकारणात आणखी एक मोठा अध्याय लिहिला जाईल, अशी चर्चा रंगत आहे.

अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी मावळमध्ये “सुनील शेळकेंना खरंच लाल दिवा मिळणार का?” याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!