दिनांक: २२/०५/२०२६
मुंबई, दि. २२: “सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन लोकसेवक युवराज दाखले यांनी आज “शिवशाही शासन” या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्य व आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समतेच्या विचाराने प्रेरित होऊन हा पक्ष स्थापन केल्याचे युवराज दाखले यांनी सांगितले.
लोकसेवक युवराज दाखले म्हणाले, “गेली 70 वर्षे प्रस्थापित पक्षांनी गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मातंग, बहुजन समाज,तृतीयपंथी भगिनी, व्यापारी यांची फक्त मतांसाठी वापर करून फसवणूक केली. शिक्षणाचा बाजार, नाल्यातील घाण, बेरोजगारी यांनी महाराष्ट्र पोखरला आहे. आता वंचितांना सत्तेत भागीदारी मिळवून देण्यासाठी ‘शिवशाही शासन’ मैदानात उतरत आहे.”
“शिवशाही शासन” पक्षाची 5 सूत्री भूमिका:
1. शिक्षण: खासगी क्लासेसची लूट बंद, सरकारी शाळा मजबूत. SC/ST/OBC/NT/VJNT साठी मोफत उच्च शिक्षण.
2. रोजगार: प्रत्येक घरात एक नोकरी, तृतीयपंथी-विधवा-दिव्यांगांसाठी विशेष योजना.
3. स्वच्छता व आरोग्य: “नालामुक्त-रोगमुक्त महाराष्ट्र” मोहीम. प्रत्येक प्रभागात मोफत दवाखाना.
4. शेतकरी-कामगार-व्यापारी:शेतमालाला हमीभाव, कामगारांना किमान 25 हजार पगार, व्यापाऱ्यांवरील जाचक अटी रद्द.
5. स्वाभिमान: छत्रपती शिवाजी महाराज,आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व इतर महापुरुषांच्या विचाराने वंचितांना सन्मान व सत्तेत वाटा.
युवराज दाखले पुढे म्हणाले, “हा पक्ष नेत्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा व जनतेचा असेल. ‘शिवशाही शासन’ म्हणजे सेवेचे शासन.”
पक्षाचे चिन्ह व निशाणी लवकरच जाहीर करण्यात येईल.असं युवराज दाखले यांनी कळविले आहे.
“जो वंचितांच्या बाजूने उभा राहील, तोच शिवशाही शासनाचा सच्चा सैनिक असेल. आता महाराष्ट्रात फक्त एकच नारा – जय शिवराय, जय लहुजी!”
– युवराज भगवान दाखले
संस्थापक प्रमुख, शिवशाही शासन
लोकसेवक
संपर्क: 9922373959
ईमेल: shivshahishasan@gmail.com

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















