Homeराजकीयशिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड...

शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड – शिवशाही व्यापारी संघाकडून सन्मान

दिनांक: १८/०५/२०२

पुणे दि. १८: शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व भीमशक्ती-शिवशक्ती – लहुशक्ती समन्वय प्रमुख गुलाबराव गरूड यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी युवराज दाखले म्हणाले, “डॉ. नीलमताई गोऱ्हे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झुंजार व लढाऊ महिला नेतृत्व आहे. सलग पाच वेळा बिनविरोध निवडून येणे हा त्यांच्या कार्याचा व जनतेशी असलेल्या नात्याचा मोठा पुरावा आहे. महिलांचे प्रश्न, कामगारांचे हक्क व व्यापारी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या विधानपरिषदेत नेहमीच आक्रमक भूमिका घेतात.”

“नीलमताई या फक्त शिवसेनेच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत.

विरोधकांनाही त्यांच्या विरोधात उमेदवार देता येत नाही, हीच त्यांची खरी ताकद आहे. शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो,” असे युवराज दाखले यांनी सांगितले.

युवराज दाखले पुढे म्हणाले, “डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी महिला सक्षमीकरण, बचत गट चळवळ, हुंडाबळी विरोधी कायदा व व्यापारी महिलांच्या हक्कांसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी व कामगार महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाही व्यापारी संघाची महिला आघाडी अधिक जोमाने काम करेल असा विश्वास दाखले यांनी व्यक्त केला”

यावेळी शिवशक्ती -भीमशक्ती- लहुशक्ती समन्वयक प्रमुख नेते गुलाबराव गरूड, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, सचिन जाधव, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

– युवराज भगवान दाखले

संस्थापक अध्यक्ष, शिवशाही व्यापारी संघ

संपर्क: 9922373959

NeelamGorhe Shivsena MLC

YuvrajDakhale ShivshahiVyapariSangh

फोटो ओळ: शिवसेना नेत्या आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवशक्ती- भीमशक्ती -लहुशक्ती समन्वयक प्रमुख नेते गुलाबराव गरूड व शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

0
  अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या...

वाकड पोलिसांकडून वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश

0
  ३ आरोपी जेरबंद, २५ दुचाकी जप्त वाकड : वाकड पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ चोरीच्या दुचाकी...

देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माझी नगरसेवक मा, हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांची पुणे जिल्हा काँग्रेस...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मा. हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तु यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल...

Translate »
error: Content is protected !!