HomePimpriनसरापूर येथील बालीकेवरील अत्याचार-खुन प्रकरणातील नराधमाला फाशी द्या - शिवशाही व्यापारी संघ...

नसरापूर येथील बालीकेवरील अत्याचार-खुन प्रकरणातील नराधमाला फाशी द्या – शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेना यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिनांक: ०३/०५/२०

पिंपरी, दि. ०३:पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे लहान बालीकेवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेचा शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेनेने तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.

शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व उद्योजक अनिल गायकवाड यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “नसरापूर येथील ही घटना समाजमन सुन्न करणारी व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोरात कठोर शासन होणे गरजेचे आहे. अशा नराधम प्रवृत्तीला समाजात स्थान नाही.”

प्रमुख मागण्या:

1. आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर कडक कलमांखाली गुन्हा दाखल करावा.

2. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून 3 महिन्यांच्या आत निकाल* लावावा.

3. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.

4. पीडित कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत व पुनर्वसन करावे.

“राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शासनाने याप्रकरणी तात्काळ व कठोर पावले उचलावीत, अन्यथा शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेना राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा युवराज दाखले व अनिल गायकवाड यांनी दिला आहे.

युवराज भगवान दाखले

संस्थापक अध्यक्ष, शिवशाही व्यापारी संघ

मुख्य प्रवक्ते, हिंदू मातंग सेना

संपर्क: 9922373959

अनिल गायकवाड(उद्योजक)

—

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!