HomePimpriएम. ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा विधी समितीचा ठराव

एम. ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा विधी समितीचा ठराव

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी घेतला निर्णय

पिंपरी, दि. १० एप्रिल २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा शंभर टक्के वापर व्हावा, तसेच महापालिकेचा व्यवहार अधिक सोपा, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा, या उद्देशाने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, कुशाग्र कदम, वर्षा जगताप, तुषार सहाणे, कुंदा भिसे, शेखर चिंचवडे यांच्यासह महापालिका सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त राजेश आगळे उपस्थित होते.

राजभाषा मराठीतून कामकाज अधिक सक्षम व परिणामकारकपणे करण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका स्तरावरील बहुतांश कामकाज आधीपासूनच मराठी भाषेत होत असून, कार्यालयीन व्यवहार, सरकारी दस्तऐवज आणि दैनंदिन कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

मराठी भाषा ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यक अशा विविध ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण मराठी माध्यमात उपलब्ध करून देणे, मराठी भाषेला नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, सर्वसामान्यांना समजेल अशी प्रशासकीय मराठी विकसित करणे तसेच बोली भाषांचे जतन व संवर्धन करणे, या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शासनामार्फत विविध शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने महापालिकेच्या विधी समितीने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव केला आहे.

मराठी भाषेतील लेखन, अनुवाद आणि अभिव्यक्ती कौशल्य वाढवण्यासाठी तसेच कार्यालयीन संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मराठी विषयामध्ये उच्च शिक्षण घेतल्यास महापालिकेच्या कामकाजात त्याचा अधिक परिणामकारक उपयोग होणार आहे. तसेच मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार-प्रसार व विकास साधावा, या दृष्टीनेदेखील हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजात मराठीचा प्रभावी व व्यापक वापर व्हावा, हा आमचा प्रमुख उद्देश आहे. एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना विशेष वेतनवाढ देण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मराठी विषयात उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होण्यास निश्चितच मदत होईल.

सुजाता बोराटे, सभापती, विधी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका

…..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!