HomePimpriएम. ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा विधी समितीचा ठरा

एम. ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा विधी समितीचा ठरा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी घेतला निर्णय

*पिंपरी, दि. १० एप्रिल २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा शंभर टक्के वापर व्हावा, तसेच महापालिकेचा व्यवहार अधिक सोपा, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा, या उद्देशाने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, कुशाग्र कदम, वर्षा जगताप, तुषार सहाणे, कुंदा भिसे, शेखर चिंचवडे यांच्यासह महापालिका सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त राजेश आगळे उपस्थित होते.

राजभाषा मराठीतून कामकाज अधिक सक्षम व परिणामकारकपणे करण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका स्तरावरील बहुतांश कामकाज आधीपासूनच मराठी भाषेत होत असून, कार्यालयीन व्यवहार, सरकारी दस्तऐवज आणि दैनंदिन कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

मराठी भाषा ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यक अशा विविध ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण मराठी माध्यमात उपलब्ध करून देणे, मराठी भाषेला नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, सर्वसामान्यांना समजेल अशी प्रशासकीय मराठी विकसित करणे तसेच बोली भाषांचे जतन व संवर्धन करणे, या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शासनामार्फत विविध शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने महापालिकेच्या विधी समितीने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव केला आहे.

मराठी भाषेतील लेखन, अनुवाद आणि अभिव्यक्ती कौशल्य वाढवण्यासाठी तसेच कार्यालयीन संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मराठी विषयामध्ये उच्च शिक्षण घेतल्यास महापालिकेच्या कामकाजात त्याचा अधिक परिणामकारक उपयोग होणार आहे. तसेच मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार-प्रसार व विकास साधावा, या दृष्टीनेदेखील हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजात मराठीचा प्रभावी व व्यापक वापर व्हावा, हा आमचा प्रमुख उद्देश आहे. एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना विशेष वेतनवाढ देण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मराठी विषयात उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होण्यास निश्चितच मदत होईल.

-सुजाता बोराटे, सभापती, विधी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका

…..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी : -उपमहापौर शर्मिला बाबर

0
  क्रांतिदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारकांना अभिवादन... पिंपरी दि.९ ऑगस्ट २०२६:- “देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अमूल्य पर्व आहे. देशासाठी...

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी (परतीचा प्रवास) सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने...

0
  पिंपरी, दि. ८ ऑगस्ट २०२६ :- आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथून विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे आज...

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

0
  अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या...

Translate »
error: Content is protected !!