HomePimpriशस्त्र परवानाधारका विरोधात मोठी कारवाई

शस्त्र परवानाधारका विरोधात मोठी कारवाई

पिंपरी : शस्त्र परवानाधारकांविरोधात मोठी कारवाई करत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी माजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकासह १५ जणांचे पिस्तुल परवाने रद्द केले आहेत. शस्त्राचा दुरुपयोग, विविध गुन्ह्यांतील सहभाग, मंजुरीनंतर मुदतीत शस्त्र खरेदी न करणे तसेच वृद्धत्व किंवा मृत्यू झाल्याच्या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय, नवीन शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या ६८ जणांचे अर्जही फेटाळण्यात आले आहेत. संबंधित अर्जदारांकडे शस्त्र परवाना देण्यासाठी आवश्यक आणि सबळ कारणे नसल्याचे चौकशीत आढळून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मयूर भोईर, सुभाष सपकाळ, विजय लांडे, साहिल ढमाले आणि शांताराम चव्हाण या पाच परवानाधारकांवर शस्त्राचा दुरुपयोग केल्याचे तसेच विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत हे आरोप सिद्ध झाल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले.

तसेच मंजुरी मिळाल्यानंतरही विहित कालावधीत शस्त्र खरेदी न करणाऱ्या दोन व्यक्तींचे परवाने रद्द करण्यात आले. याशिवाय वृद्धत्व आलेले किंवा मृत्यू झालेल्या आठ परवानाधारकांचे परवानेही रद्द करण्यात आले. त्यामुळे एकूण रद्द झालेल्या शस्त्र परवान्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे.

नवीन शस्त्र परवान्यासाठी आलेल्या अर्जांचीही सखोल छाननी करण्यात आली. यामध्ये ६८ अर्जदारांकडे शस्त्र बाळगण्याची आवश्यक गरज किंवा पुरेसे कारण नसल्याचे आढळल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.

शस्त्र परवान्यांच्या बाबतीत पोलीस आयुक्तालयाने कठोर धोरण स्वीकारले असून, शस्त्रांचा गैरवापर रोखण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

रद्द करण्यात आलेल्या परवानाधारकांमध्ये विजय लांडे यांचा समावेश असून ते तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी स्वीकृत नगरसेवक होते. ही कारवाई केवळ कायदेशीर व प्रशासकीय निकषांच्या आधारे करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!