देहूरोड :- देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्डाच्या भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आरोग्य विभागाच्या वतीने आज २८ जुन २०२६ रोजी देहूरोड परिसरातील विविध पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ५ वर्षा पर्यंत च्या बालकांच्या पालकांनी आपल्या नजीकच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर आपल्या बालकाला पल्स पोलिओ लस पाजुन या आरोग्य उपक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्डाच्या भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे निवासी मुख्य आरोग्याधिकारी डाँ.श्रीनिवास चाटे यांनी केले आहे. देहूरोड कँन्टोन्मेंट हद्दीत चिंचोली :- दत्त मंदिर, नागरि प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हई :- एच. डब्लू सी झेंडेमळा :- मारुती मंदिर अलकापुरी :- मंदिर सिद्धिविनायक नगरी:- गणेश मंदिर,श्री विहार दत्त नगर:- अंगणवाडी. रेल्वे स्थानक:- देहूरोड
देहूरोड :- भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय
पार्शिचाळ :- वाल्मिकी ऋषी मंदिर
मेन बाजार :- ज.नेहरु मंगल कार्यालय एम.बी. कँम्प :- एच.डब्लू.सी. हेल्थ अँड वेलनेस सेंटर
शिवाजीनगर:- मरिमाता मंदिर, मंदिर , दत्त मंदिर
डाॅ.आंबेडकर नगर:- दुर्गा माता मंदिर
गांधीनगर :- उर्दू शाळा
मेहता पार्क :- कोहली गॅस कार्यालय शितळानगर क्र.२ :- गुरुद्वारा थाँमस काँलनी :- लायन्स क्लब शाळा, सेंट जाॅर्ज आश्रम शाळा, मामुर्डी:- बुद्ध विहार, कँन्टोन्मेंट शाळा
सर्वत्र नगर:- सांस्कृतिक गृह
शेलारवाडी :- दत्त मंदिर
कोटेश्वर वाडी :- कँन्टोन्मेंट शाळा
देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहत:- रुग्णालय
लष्करी वसाहत:- लष्करी रुग्णालय
बेगडेवाडी:- आर्मी लष्करी कँम्प मोबाईल गट, ट्रान्झिट गट अशा या ३० केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाँ.श्रीनिवास चाटे यांनी माहिती दिली.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















