देहूरोड | प्रतिनिधी
देहूरोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (दि. २६ जानेवारी) सकाळी ८.३० वाजता सुभाष चौक, मेन बाजार, देहूरोड येथे ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात ध्वजारोहण श्रीमती सविता अनिल व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शोभा शिवकुमार गुप्ता उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आले देशभक्तीपर वातावरणात राष्ट्रगीत सादर करण्यात आले.
कार्यक्रमाला विशेष सत्कारासाठी उपस्थित असलेले साजिद तांबोळी (भारतीय दिव्यांग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल) यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले.
या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष आशिष सुभाष बंसल, उपाध्यक्ष संजय कांतीलाल पारेख, विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल, सचिव सूर्यकांत भिमराव सूर्ये, खजिनदार राजू उर्फ पंडित रावल तसेच कार्याध्यक्ष अमोल अनिल व्यवहारे यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रनिर्माणात व्यापारी वर्गाच्या योगदानाचा उल्लेख करत सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. देहूरोड व्यापारी असोसिएशनच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















