HomePimpriविद्यानगरमधील चिमुकलीवरील अत्याचार सहन केला जाणार नाही, नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे

विद्यानगरमधील चिमुकलीवरील अत्याचार सहन केला जाणार नाही, नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे

पोलीस प्रशासनाची तात्काळ कारवाई…दोषीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.! 

आज प्रभागातील विद्यानगर येथे ८ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. त्या संदर्भात तेथील संबंधित पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या समवेत तेथील महिला व नागरिकांची मीटिंग घेण्यात आली. संबंधित गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी हि मागणी यावेळी सर्वांनी केली. या मीटिंग मध्ये विद्यानगर भागात मागील काही काळापासून नोकरी, व्यवसायासाठी बाहेरून येणाऱ्या तरुणांना घरे भाड्याने देण्यात आली आहेत, या भाडेकरूंची पोलीस पडताळणी करण्यात यावी हि देखील मागणी यावेळी करण्यात आली. पुढील काळात प्रभागातील वसाहतींमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व नागरिकांनी देखील जागरूक आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. या घटनेतील दोषीला कठोर शिक्षा होई पर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

विद्यानगर परिसरात एका ८ वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेला अत्याचार अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. आपल्या शहरात अशा विकृत प्रवृत्ती डोकं वर काढत असतील, तर त्यांना वेळेतच ठेचून काढणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत, पोलीस बांधवांनी तपासाची सूत्रे अत्यंत जलद गतीने हलवली आहेत. आरोपी हा अल्पवयीन निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन बालसुधारगृहात (बालकारागृहात) रवानगी केली आहे. गुन्हेगाराची विकृती पाहता, कायद्याच्या चौकटीत राहून त्याला कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल, यासाठी पोलीस प्रशासन आणि आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. तसेच, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील महिला, मुली व नागरिकांच्या सुरक्षेसाठी विद्यानगर परिसरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची यंत्रणा गतीने कार्यान्वित करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाला विनंती करतो की, या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. जोपर्यंत पीडितेच्या कुटुंबाला पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा अखंड सुरू राहील. आम्ही या लढ्यात पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत.

अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना समाजात अजिबात स्थान नाही!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा संपन्न,

0
  पारधी समाजातील युवकांनी पुढे येऊन नवीन पिढी घडवावी लागेल असे आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल,आदिवासी विकास संघ आयोजित आदिवासी दिनानिमित्त मेळाव्यात नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे...

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी : -उपमहापौर शर्मिला बाबर

0
  क्रांतिदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारकांना अभिवादन... पिंपरी दि.९ ऑगस्ट २०२६:- “देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अमूल्य पर्व आहे. देशासाठी...

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी (परतीचा प्रवास) सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने...

0
  पिंपरी, दि. ८ ऑगस्ट २०२६ :- आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथून विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे आज...

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

0
  अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

Translate »
error: Content is protected !!